Lungfish : पाण्याशिवाय जिवंत राहूू शकणारे मासे!

Lungfish
Lungfish

मेक्सिको : आजवर आपण हेच ऐकले पाहिले आहे की, पाण्याबाहेर मासा आला की तडफडतो आणि अशीच स्थिती राहिली तर गतप्राणही होतो. बहुतांशी माशांची स्थिती अशीच असतेही. पण दोन प्रकारचे मासे असेही आहेत, जे पाण्याबाहेर देखील कित्येक वर्षे आरामात जगू शकतात. Lungfish या दोन प्रजाती आहेत प्लेक्स व लंगफिश!

पृथ्वीतलावर ज्या विचित्र गोष्टी आहेत, त्यात या माशांचा आवर्जून समावेश होतो. प्लेक्स व लंगफिश Lungfish या माशांच्या दोन प्रजाती अन्य प्रजातींपेक्षा बर्‍याच वेगळ्या आहेत. एरव्ही माशाचा मृत्यू पाण्याबाहेर होत असतो; पण या दोन प्रजाती पाण्याशिवाय कित्येक महिने, कित्येक वर्षे आरामात जगू शकतात. या प्रजातींचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या वाळूत घुसून सुकवून घेतात आणि त्यांच्यावर पुन्हा पाणी पडते, त्यावेळी ते सक्रिय होतात. जोवर पाणी पडत नाही, तोवर ते एखाद्या दगडाप्रमाणेच दिसतात.

अशा प्रकारचे मासे जेथे पाणी कमी असते, अशा ठिकाणी आढळून येतात. जिथवर पाणी असते, तिथवर हे मासे सर्वसाधारण माशाप्रमाणे विहार करत असतात. पण पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले तर हे मासे Lungfish स्वत:ला मातीबरोबर सुकवून घेतात. आफ्रिकन लंगफिश तर पाण्याशिवाय चार वर्षे जगू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news