नाशिक

नाशिक : भिशीचे पैसे बुडविणाऱ्या दोघांना कारावास

गणेश सोनवणे

नाशिक : सरकारमान्य लिलाव भिशीचे पैसे बुडविणाऱ्या आरोपीस दंडासह कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रमजान कादर बागवान व ताहीर कादर बागवान (दोघेही, रा. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना भारतीय चलनक्षम दस्तएेवज कायदा १३८ अन्वये फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम २५५ (२) अन्वये दोषी ठरविले असून, दोघांनाही सहा महिन्यांचा कारावास व ७० हजारांचा दंड ठोठावला आहे.

दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचा निर्णय संगमनेरच्या अतिरिक्त न्याय दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे. नाशिक चीट प्रा. लि. या सरकारमान्य दैनंदिन भिशी कंपनीच्या वतीने अॅड. प्रशांत कोल्हे यांनी बाजू मांडली. तर आरोपींच्या वतीने अॅड. राजेश भुतडा यांनी काम पाहिले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT