नाशिक

नाशिक : मनपाची गोदाकिनारी स्वच्छता मोहीम

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'स्वच्छता पंधरवडा' राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने गोदाकिनारी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

संबधित बातम्या :

'इंडियन स्वच्छता लीग' हा या उपक्रमाचा एक भाग असून, नाशिक महापालिकेने 'नाशिक झिलर्स' या संघासह लीगमध्ये सहभाग नोंदविला आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकर याच्याकडे मनपा संघाचे कर्णधारपद आहे. नाशिककरांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उपक्रमाच्या अनुषंगाने रविवारी (दि. १७) गौरी पटांगण, पंचवटी या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविली. याप्रसंगी चिन्मय उदगीरकरसह घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. कल्पना कुटे, उपआयुक्त प्रशांत पाटील, विभागीय अधिकारी योगेश रकटे, कार्यकारी अभियंता मैड, राजेंद्र शिंदे, उपअभियंता घोलप, अभिनेते किरण भालेराव, स्वच्छताप्रेमी राजेश पंडित, चंदू पाटील व मनपाचे सहा विभागांतील स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छता मोहिमेत मनपासह शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना, स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी संपूर्ण गोदावरी नदीकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला. यावेळी उपस्थित ५०० स्वयंसेवक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना स्वच्छताविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT