नाशिक

Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज माफिया ललितसह चौघांना आज न्यायालयात हजर करणार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-येथील शिंदे गावात एमडी कारखाना व गोदाम चालविल्या प्रकरणी अटकेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पानपाटीलसह इतर तिघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने चौघांनाही सोमवारी (दि. १८) न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. दरम्यान, पोलिस कोठडीत असताना ललितसह इतरांनी ड्रग्जसंबंधित अनेक खुलासे केल्याने या प्रकरणातील रहस्य समोर येणार आहे.

शिंदे गावातील एमडी प्रकरणात संशयित ललितसह रोहित चौधरी, हरीश पंत, जिशान शेख हे अमली पदार्थविरोधी पथकाच्या कोठडीत आहेत. चौकशीत ललितच्या सांगण्यावरून भूषण पानपाटील, अभिषेक बलकवडे व जिशान शेख यांनी शिंदे गावात कारखाना सुरू असून एमडी तयार केल्याचे उघड झाले. चाकणचा कारखाना उघड झाल्यावर कारागृहात असताना ललितने भूषण आणि अभिषेकच्या माध्यमातून नाशिकमध्ये एमडी तयार करण्यास सुरुवात केली होती. ललितसह चौघांच्या कसून चौकशीनंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

एमडी नेणाऱ्यांचाही ताबा घेणार

शिंदे गावातील कारखान्यातून तयार झालेले एमडी मुंबईमार्गे इतरत्र जात होते. एमडी घेण्यासाठी दोन संशयितांचा महत्त्वाचा सहभाग उघड झाला आहे. त्यामुळे शहर पोलिस या दोघांचाही ताबा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर ललित पानपाटील ड्रग्ज प्रकरणात नाशिकचे दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे समजते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT