नाशिक

जळगाव : पोलिस दलात निवड झालेल्या मुलीला दिला बनावट दाखला

गणेश सोनवणे

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे गावात राहणारी पूजा संजय कोळी यांची 2021 मध्ये पोलीस दलात निवड झाली होती. निवड झाल्यानंतर त्यांना नॉन क्रिमिलेअर व उत्पन्नाचा दाखला आवश्यक असल्याने त्यांनी महा सेवा केंद्रातून तयार करण्यास दिला होता. महा सेवा केंद्र चालकाने तो बनावट दिल्याने त्याच्याविरुद्ध बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित बातम्या :

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा गावात राहणारी पूजा संजय कोळी यांची 2021 मध्ये पोलीस दलात निवड झाली होती. निवड झाल्यानंतर कागदपत्रांची आवश्यकता असल्याने त्यांनी सेतू चालक उत्तम काशिनाथ इंगळे यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर दाखला मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. त्यासाठी आवश्यक कागदपत्रेही दिली. 30 नोव्हेंबर 2021 रोजी पूजा हिला नॉन क्रिमिलेअर दाखला मिळाला. त्या आधारावर त्यांनी मुंबई पोलीस दलात निवड झाली.

त्यानंतर हा दाखला पडताळणीसाठी भुसावळ तहसील कार्यालयात आला असता त्यावेळी त्यावर 21 अंकी क्रमांक आणि बार कोडची पडताळणी झाली नाही. त्यानंतर उत्तम इंगळे यांनी पूजा याच्याकडे पुन्हा कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी त्यांनी ही कागदपत्रे तहसीलदार यांना पडताळणीसाठी मागितलेले सांगितले होते. त्यावरून 20 सप्टेंबर 2023 रोजी नॉन क्रिमिनल साठी बनावट अर्ज सादर केला. यात वेल्हाळात तलाठी यांचा 12 सप्टेंबर 2023 रोजीचा पूजेचे वडील संजय पुंडलिक कोळी यांच्या नावाचा बनावट उत्पन्नाचा दाखला तयार केला ते समोर आले.

त्यामुळे नायब तहसीलदार सदाशिव लुटे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT