महती नवदुर्गांची : श्री महाकालीदेवी (श्री कालाविका) | पुढारी

महती नवदुर्गांची : श्री महाकालीदेवी (श्री कालाविका)

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई होय. करवीर निवासिनीच्या सभोवताली असणाऱ्या विविध देव- देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर त्र्यंबोली, उज्ज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात. देवांच्या रक्षणासाठी व दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्रीशक्तीने अवतार घेतले. या अवतारांमध्ये नवदुर्गांना विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत या नवदुर्गांचे उल्लेख आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गांची माहिती जाणून घेऊया.

नवदुर्गातील पठदुर्गा देवी म्हणजेच श्री महाकालीदेवी (श्री कालाविका) होय. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक ते साकोली रस्त्यावर महाकालीचे जुन्या काळातील मंदिर आहे. मंदिरात तीन फूट उंचीची काळ्या पाषाणातील सर्वांगसुंदर मूर्ती आहे. देवी महादेव दत्त, हनुमंत सर्व नवीय सिद्ध पुरुषांच्या पवित्र समाधी या देवीच्या परिवार देवता आहेत.

परात्पर महाकालाची शक्ती. सृष्टीचा लय करणारी देवता, तामसगुणसार, रुद्रस्वरूपा विश्वशक्तीचे आद्यस्वरूप असे महत्व आहे. सृष्टीच्या आरंभी शेषावर योगनिद्रिस्त असणाऱ्या विष्णुच्या कानातून उत्पन्न झालेल्या मधु-कैटभ राक्षसांना मारण्यासाठी देवीला प्रार्थना केली. तेव्हा विष्णूच्या शरीरातून देवी तेज रूपाने बाहेर आली आणि तिने मधु-कैटभ या दैत्यांना ठार मारले. अतिप्राचीन असणारे हे दैवत विरक्तीपूर्ण व लयाच्या प्रतीकयुक्त असते. ही मोहमायेची लय विशुद्ध आत्मज्ञान देते.

दशमहाविद्योपासनेतील कालिकुलाची मुख्यदेवता ब्रह्मस्वरूपा महाकालीची विश्वारंभी दक्षिण भैरव सदाशिवानी प्रथमपूजा केली. त्यामुळे तिला दक्षिणकालिका (दक्षिणेश्वरी) म्हणतात. दक्षिणेकडे मुख असलेल्या कालिकेलासुद्धा दक्षिणकालिकापूजा सर्वाधिक प्रचलित आहे. कानिमंत्रदीक्षामधील कालिमातेचे प्रकार असे- चिंतामणी काली, स्पर्शमणी काली, संततिप्रदा काली, सिद्धकाली, कामकला काली, हंसकाली, गुह्यकाली, भर्दकाली, स्मशानकाली, महाकाली.

Back to top button