Navratri Fast : संध्याकाळच्या भुकेसाठी ट्राय करा फलाहारी भेळ | पुढारी

Navratri Fast : संध्याकाळच्या भुकेसाठी ट्राय करा फलाहारी भेळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपवास असो कि नसो. संध्याकाळी चहासोबत काहीतरी चटपटीत खायला सगळ्यांनाच आवडतं. नवरात्रीच्या नऊ दिवसांत तेच वेफर्स आणि पदार्थ खाऊन कंटाळा येतो. (Navratri Fast ) सतत काहीतरी चटपटीत खायची सवय असलेल्यांची मात्र उपवसाच्या दिवसांत भलतीच अडचण होते. अशा वेळी काहीतरी वेगळा पर्याय हवा असेल तर फलाहारी भेळ जरूर ट्राय करा.… (Navratri Fast )

साहित्य :

शाबुदाणा (भिजवलेला ) : अर्धा कप

उकडलेला बटाटा : 1

काजू : 1 चमचा

लाल मिरची पावडर : चवीनुसार

शेंगदाणे : दोन चमचे

कोथिंबीर : बारीक चिरून

सैंधव मीठ : चवीपुरता

लिंबाचा रस

तूप

file photo
file photo

कृती :

उकडलेला बटाटा साल काढून एक बाउलमध्ये घ्यावा. एका कढईत तूप गरम करून घ्यावं. त्यावर शेंगदाणे आणि काजू परतून घ्यावेत. ते परतल्यावर एका बाजूला काढून ठेवावेत. त्याच कढईत अर्धा कप भिजवलेला शाबुदाणा घालावा. तो मऊ होईपर्यंत परतावा. मऊ झाल्यानंतर एका बाजूला काढून ठेवावा. त्यावर बटाटा मॅश करून घालावा. त्यानंतर त्यावर काजू, शेंगदाणे, कोथिंबीर, मिरची पावडर, मीठ, लिंबांचा रस घालावा. सगळं मिक्स करून सर्व्ह करावं. त्यावर आवडत असल्यास बटाटा चिवडा घालावा.

Back to top button