Imtiaz Jaleel Bail Nashik TCS Case  File photo.
नाशिक

Nashik TCS Case : नाशिक 'टीसीएस' प्रकरणी 'एमआयएम' नेते इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर

Imtiaz Jaleel Bail Nashik TCS Case : प्रमुख संशयित आरोपी निदा खानला मदत केल्‍याचा जलील यांच्‍यावर आरोप

पुढारी वृत्तसेवा

Imtiaz Jaleel Bail Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी एमआयएमचे (MIM)नेते इम्तियाज जलील ( Imtiaz jaleel) यांना 50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी नाशिक न्‍यायालयाने जलील यांना समन्‍स बजावले होते. आज (दि. १९ नोव्‍हेंबर) - न्यायमूर्ती खारकर यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाकडून जलील यांना जामीन मंजूर केला.

निदा खान हिला मदत केल्‍याच जलील यांच्‍यावर आरोप

या प्रकरणातील प्रमुख निदा खान हिला मदत केल्‍याच जलील यांच्‍यावर आरोप आहे. पोलीस निदा खानचा शोध घेत असताना तिला मदत केल्‍याचा जलील यांच्‍यावर आरोप आहे. मतीन पटेल यांनी जलील यांच्या सांगण्यावरूनच निदा खान हिला आश्रय दिल्याचा पोलिसांनी म्‍हटलं होतं.

इम्तियाज जलील यांच्‍यावर झाला होता गुन्‍हा दाखल

इम्तियाज जलील यांच्‍यावर निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटी तपास करत आहे.

नगरसेवक मतीन पटेल यांच्‍या फोनमधील रेकॉर्डिंगवरुन कारवाई

तपासावेळी पोलिसांना नगरसेवक मतीन पटेल यांच्या फोनमध्ये काही रेकॉर्डिंग मिळाल्या होत्या. यातील माहितीच्‍या आधारे इम्तियाज जलील यांचेही नाव या प्रकरणाशी जोडले गेले. मतीन पटेल यांनी जलील यांच्या सांगण्यावरूनच निदा खान हिला आश्रय दिल्याचा पोलिसांनी स्‍पष्‍ट केले होते.

"लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणी निदा खानची भूमिका महत्त्‍वाची"

टीसीएस धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणी यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले की, या प्रकरणाच्‍या प्राथमिक चौकशीत प्रथमदर्शनी असे दिसते की, निदा खानने इतर सहआरोपींसोबत मिळून पीडितेला मानसिकदृष्ट्या प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन करून 'हिंदू धर्म योग्‍य नाही' असे सांगत तिची विचारसरणी आणि धर्म बदलण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये स्पष्टपणे आहे. लैंगिक छळ आणि धर्मांतरणाशी संबंधित या प्रकरणात निदा खानची भूमिका महत्त्वाची असल्याचे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT