उत्तर महाराष्ट्र

Nashik: भद्रकालीतील त्र्यंबक दरवाजा परिसरात पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भद्रकालीतील त्र्यंबक दरवाजा परिसरात पानमसाला, सुगंधी तंबाखूचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख नवाख पठाण (२६, रा. वडाळागाव) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून एक लाख ७८ हजार ६०० रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांच्यासह अविनाश दाभाडे व गोपाल कासार यांच्या पथकाने सोमवारी (दि.२७) ही कारवाई केली. पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे त्र्यंबक दरवाजा परिसरातील एका गोदामात शाहरुखने गुटखा, पानमसाला व प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थांचा साठा करून ठेवला होता. त्यामुळे पथकाने अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गणेश परळीकर व सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारच्या सुमारास गोदामावर छापा टाकून पाहणी केली असता तेथे साठा आढळून आला. त्यामुळे रासकर यांच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात शाहरुखविराेधात अन्नसुरक्षा मानक कायद्यासह भारतीय दंड विधान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पथकाने तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT