नाशिक : प्रदुषण नियंत्रण मंडळाचे दोन लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

नाशिक : प्रदुषण नियंत्रण मंडळाचे दोन लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : अहमदनगर येथील गोल्ड काऊन्सलिंग क्लस्टर या संस्थेच्या हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरु करण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे समंती पत्र देण्याच्या मोबदल्यात नाशिक प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या दोघा अधिका-यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

प्रवीण मनोहर जोशी (प्रादेशिक अधिकारी) व कुशल मगननाथ औचरमल (क्षेत्र अधिकारी) असे दोघा लाचखोर अधिका-यांची नावे आहेत. याबाबत तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार दोघा अधिका-यांनी प्रत्येकी पंधरा हजार याप्रमाणे तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अधिकारी अनिल बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली किरण अहिरराव, अजय गरुड, वैभव देशमुख, नितीन डावखर यांच्या पथकाने नाशिक येथे या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

हेही वाचा :

Back to top button