उत्तर महाराष्ट्र

नाशिक : 12 ते 14 वयोगटासाठी पहिल्या दिवशी ‘इतक्या’ मुलांचे लसीकरण

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
12 ते 14 या वयोगटासाठी गुरुवारपासून (दि.17) मनपामार्फत पहिल्या दिवशी 193 मुलांचे लसीकरण करण्यात आले. मनपा हद्दीत सहा ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली आहे.

मनपा आरोग्य वैद्यकीय विभागाने 12 ते 14 वयोगटातील मुलांना दिल्या जाणार्‍या कॉर्बेव्हॅक्स लसीकरणाकरिता मेरी कोविड सेंटर पंचवटी, उपनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र उपनगर, कामटवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र सिडको, बारा बंगला शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र पारिजातनगर, इएसआय हॉस्पिटल सातपूर, नवीन बिटको हॉस्पिटल नाशिकरोड या सहा ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत.

जिल्ह्यात नव्याने 5 कोरोनाबाधित…

जिल्ह्यात गुरुवारी (दि. 17) नव्याने पाच कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात नााशिक शहरात दोन व ग्रामीणमधील तीन बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 13 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद नसल्याने दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी नाशिक शहरात 53 व ग्रामीण भागात 21 बाधितांवर उपचार सुरू होते. त्यापैकी अवघ्या 10 बाधितांमध्ये लक्षणे आढळून आली व त्यांची तब्येत स्थिर आहे. जिल्ह्यातील 298 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात एकूण चार लाख 75 हजार 966 कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यापैकी चार लाख 66 हजार 993 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एकूण आठ हजार 899 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT