नाशिक : गाळा विक्रीच्या बहाण्याने वृध्दाला ५ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार कॉलजरोड परिसरात उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र स्वरूपचंद गोठी (६२) यांच्याकडून संशयित गिरीजा अग्रवाल, सृष्टी अग्रवाल, त्रृतिकराज अग्रवाल यांनी एसके ओपन मॉलमध्ये ३१०० स्वेअर फूट गाळ्याची विक्री करण्याची ठरवून ५ लाखांचे टोकन घेतले. गाळ्याचे शिर्षक पडताळणीचे टायटल क्लिअरचे कोणत्याही प्रकारची परवानगी न देता विक्री करार नोंदणी करून न देता गोठी यांचा विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.