उत्तर महाराष्ट्र

नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी दोघांना कारावास

गणेश सोनवणे

नाशिक : कीटकनाशके व बी-बियाणे खरेदी करून त्यापोटी दिलेले धनादेश बँकेत न वटल्याने न्यायालयाने दोघांना वर्षभर कारावास व 10 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. श्री समर्थ अ‍ॅग्रो सेंटरचे संचालक सचिन भास्कर जोईल (43) व विनायक शांताराम जोईल (45, दोघे रा. देवगड, जि. सिंधुदुर्ग) अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.

पेठ फाटा येथे निशिकांत जयराम सूर्यवंशी यांची लक्ष्मी अ‍ॅग्रो एजन्सी असून, त्यांचा कीटकनाशके व बी-बियाणे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून दोघांनी डिसेंबर 2010 पर्यंत उधारीवर 14 लाख 56 हजार 830 रुपयांचा माल खरेदी केला. मालाचा परतावा म्हणून दोघांनीही सूर्यवंशी यांना जानेवारी 2011 मध्ये धनादेश दिला. मात्र, ज्या बँक खात्याचा धनादेश होता ते खाते बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे सूर्यवंशी यांनी न्यायालयात दाद मागितली.

सूर्यवंशी यांच्या वतीने अ‍ॅड. अक्षय कलंत्री व सहायक वकील राजन मालपुरे यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जी. कोरे यांनी दोघांविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने शिक्षा सुनावली. त्यानुसार दोघांनाही 10 लाख रुपयांचा दंड व वर्षभर कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT