उत्तर महाराष्ट्र

नाशिक : वाखरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

Shambhuraj Pachindre

देवळा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मौजे-वाखारी (ऊबर ओहळ शिवार) येथील बाजीराव भागुजी जाधव यांच्या मालकीच्या गट नं. १३३० मध्ये बुधवार (दि २८) रोजी दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास नानाजी दादाजी पवार, (वय – ५२ ) व लक्ष्मण बाजीराव जाधव, (वय – ४०) या दोन शेतकऱ्यांवर बिबट्या ने हल्ला केल्याने यात गंभीर जखमी झाले आहेत.

बिबट्याच्या या दहशतिने परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना पुढील उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. यातील लक्ष्मण बाजीराव जाधव, (वय ४० ) यांच्या कपाळावर व गालावर खोल जखम झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर, नानाजी दादाजी पवार यांना हातावर व पाठीवर किरकोळ जखम असल्याने त्यांचेवर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.

घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी कौतीक ठुमसेंसह वनपाल पी. एस. पाटील, वनरक्षक विजय पगार, वाहन चालक राजेद्र भदाणे दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन नागरीकांना काळजी घेण्याच्या सुचना केल्या. परिसरात बिबट संदर्भात योग्य त्या उपाय योजनासाठी पिंजरा व ट्रॅककॅमेरा लावण्यात आला आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT