उत्तर महाराष्ट्र

Nashik : ञ्यंबकेश्वरला पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पालखी

गणेश सोनवणे

ञ्यंबकेश्वर( जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

पेशवेकालीन परंपरा असलेल्या येथील मंदिरात बुधवारी (दि.22) गुढीपाडव्यास सायंकाळी मंगलवाद्यांसह पारंपरिक पध्दतीने पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पालखी काढण्यात आली.

मंदिर सभामंडपात सुवर्ण मुखवटा नेण्यात आला. तेथे प्रदोष पुष्प पूजक आराधी यांची पूजा झाली. विश्वस्त भूषण अडसरे, संतोष कदम, प्रशांत गायधनी उपस्थित होते. पुजारी राज तुंगार यांनी सुवर्ण मुखवटा आराधी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी तो शिवपिंडीवर ठेवला. यावेळी कमिशनर पदावर कार्यरत हर्षद आराधी, डॉ. ओमकार आराधी, ॲड. शुभम आराधी यांच्यासह आराधी परिवारातील सदस्य गर्भगृहात उपस्थित होते. त्यांनी भगवान ञ्यंबकराजाचा शृंगार केला. उपस्थित भाविकांना दर्शनाच्या सुवर्णयोगाचा लाभ मिळाला. सायंकाळी 7.30 ला ञ्यंबकेश्वरचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा पालखीतून कोठी इमारतीत नेला. यावेळी विश्वस्तांसह पुजारी प्रदीप तुंगार, मनोज तुंगार, श्रीपाद देशमुख, शागीर्द अजिंक्य जोशी, मंगेश दिघे, प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, रश्वी जाधव, विजय गांगपुत्र, उत्तम भांगरे, आंबकेर, पिंगळे आदी उपस्थित होते.

दरवर्षी गुढीपाडव्यास व दिवाळी पाडव्यास शिवपिंडीवर सुवर्ण मुखवटा ठेवून प्रदोष पुष्प पोशाख शृंगार पूजा केली जाते. इतर वेळेस वर्षभर दररोज प्रदोष पूजेत चांदीचा मुखवटा ठेवला जातो. वर्षभरात दुर्मीळ असलेल्या या देवाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी बाहेर गावचे आणि स्थानिक गर्दी करतात. हा पंचमुखी सुवर्ण मुखवटा दर साेमवारी पालखीतून कुशावर्तावर स्नानास नेण्यात येतो.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT