उत्तर महाराष्ट्र

नाशिक : आता स्लम चार्जेसही ऑनलाइन भरता येणार, करपावत्या वाटपातील विलंबावर मनपाचा उपाय

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

करपावत्या वाटप करण्यास होणारा विलंब पाहता नागरिकांना घरबसल्या विनाविलंब ऑनलाइन कर भरता यावा आणि त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी मनपाने घरपट्टी, पाणीपट्टीसाठी ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध करून दिली असून, त्याच धर्तीवर आता स्लम चार्जेसदेखील ऑनलाइन भरता यावे याकरता मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

नव्या आर्थिक वर्षात स्लम चार्जेस अर्थात स्लम पट्टी ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया उपलब्ध होऊ शकते. त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. शहरात एकूण १५९ इतक्या अधिकृत झोपडपट्ट्या आहेत. याठिकाणी ४१ हजार ४०७ इतक्या झोपड्या असून, या झोपडपट्टीधारकांकडे ३१ मार्च २०२२ अखेरपर्यंत एक कोटी ४ लाख ७७ हजार इतकी स्लमपट्टी थकीत आहे. यापैकी आतापर्यंत केवळ १३ लाख रुपये स्लम चार्जेस मनपाच्या तिजोरीत जमा झाले असून, चालू मागणी ५४ लाख रुपयांची आहे. घरपट्टी, पाणीपट्टीप्रमाणेच स्लमपट्टीची डिमांड पावतीदेखील वेळीच वाटप होत नसल्याने अनेक झोपडपट्टीधारकांकडून चार्जेस भरले जात नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे स्लमपट्टीच्या थकबाकीचा डोंगरदेखील वाढत आहे. यामुळेच आता स्लमपट्टी वेळीच जमा व्हावी, याकरता मनपा प्रशासनाने घरपट्टी, पाणीपट्टीप्रमाणेच स्लमपट्टी भरता यावी याकरता ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध करून देण्याकरिता पावले उचलली आहेत. या प्रक्रियेमुळे झोपडपट्टीधारकांनी यादी तयार होऊन त्यांना वेळच्या वेळी स्लमपट्टी वाटप करता येऊ शकते.

स्लमपट्टीपोटी अधिकृत झोपडपट्टीधारकांकडून वर्षाकाठी ३०० रुपये शुल्क घेतले जाते. या चार्जेसमधून झोपडपट्ट्यांमध्ये वीज, पाणी, स्वच्छतागृह यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ४१ हजार झोपड्यांपैकी आतापर्यंत घरकुल आवासअंतर्गत ४४६० कुटुंबांना घरकुल वाटप करण्यात आले असून, संबंधितांची नावे झोपडपट्टीधारकांमधून वगळण्यात येणार आहेत.

डिमांड रजिस्टर, पावत्या संपल्या

सहा विभागांपैकी पूर्व तसेच इतर काही विभागांमध्ये डिमांड पावत्या तसेच डिमांड रजिस्टर संपले आहेत. मात्र, त्याबाबत मनपा मुख्यालयातील यंत्रणेलाही माहिती नाही की स्लम विभागाकडूनही कधी कामकाजाचा आढावा घेतलेला दिसत नाही. त्यामुळेच डिमांड पावत्या, रजिस्टर संपल्यानंतरही या विभागाला माहिती नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT