काेल्हापर : सत्तारूढ नरके पॅनेलचे उमेदवार जाहीर

काेल्हापर : सत्तारूढ नरके पॅनेलचे उमेदवार जाहीर
Published on
Updated on

कोपार्डे, पुढारी वृत्तसेवा : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारूढ नरके पॅनेल उमेदवारांची यादी पॅनेल प्रमुख माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सोमवारी जाहीर केली. यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके व सर्व उमेदवार उपस्थित होते.

नरके म्हणाले, एकूण 23 संचालकांपैकी 14 नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे. तसेच 9 जुने जाणते संचालक यांचा पॅनेलमध्ये समावेश केला आहे. पॅनेलचा प्रचार शुभारंभ शुक्रवार (दि. 3) सकाळी 9 वा. कसबा बीड येथे आहे. सर्व सभासदांनी व ऊस उत्पादकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नरके यांनी केले.

उमेदवार असे :

उत्पादक सभासद : गट क्रमांक 1 : अनिल पाटील (वाकरे), भगवंत पाटील (बी. बी.) (वाकरे), अ‍ॅड. बाजीराव शेलार (कुडित्रे).
गट क्रमांक 2 : राहुल खाडे (सांगरुळ), उत्तम वरुटे (कसबा बीड), किशोर पाटील (शिरोली दुमाला), दादासो लाड (गणेशवाडी) सर्जेराव हुजरे (महे).
गट क्रमांक 3 : संजय पाटील (खुपिरे), सरदार पाटील (पाडळी खुर्द), विश्वास पाटील (कोगे).
गट क्रमांक 4 : बळवंत पाटील करचे (यवलूज), अनीष पाटील (कसबा ठाणे), प्रकाश पाटील (तिरपण)
गट क्रमांक 5 : चंद्रदीप नरके (बोरगाव), प्रकाश पाटील (पाटपन्हाळा), वसंत आळवेकर (तांदूळवाडी), राऊ पाटील (पणुत्रे).
अनुसूचित जाती किंवा अनु. जमाती : कृष्णात कांबळे (कोगे), महिला सदस्य : धनश्री पाटील
(आमशी), प्रमिला पाटील (पडळ). इतर मागासवर्गीय सदस्य : विलास पाटील (कोपार्डे), भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग : युवराज शिंदे (वरणगे).

4 अपक्षांसह 50 उमेदवार रिंगणात

कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून शेवटच्या दिवसाअखेर एकूण 375 अर्जांपैकी 325 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 50 उमेदवार लढणार हे निश्चित झाले. सोमवार शेवटचा दिवस असल्याने अर्ज माघारीसाठी मोठी गर्दी झाली होती. सत्तारूढ नरके पॅनेल व विरोधी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव मंच पॅनेल यांनी आपले प्रत्येकी 23 उमेदवार जाहीर केले असून 4 अपक्षांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. दोन्ही पॅनेल प्रमुखांनी इच्छुकांची मनधरणी करून अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले.

अपक्षांमध्ये गट क्रमांक 4 : सरदार पाटील (तिरपण), अनुसूचित जाती किंवा अनु. जमाती : कोंडिबा कांबळे (आरळे) व नाथा दौलू माळवी (चिंचवडे तर्फ कळे), इतर मागासवर्गीय सदस्य : प्रकाश चौगले (खुपिरे) यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news