उत्तर महाराष्ट्र

नाशिक : महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्या ‘इनकॉन टॉक्स’

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागतिक स्तरावर होत असलेला वातावरण बदल आपण गेल्या काही वर्षांपासून अनुभवत आहोत. तापमान, अवकाळी पाऊस, नद्या आणि त्यात मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण या विषयावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे सोमवारी (दि. 30) दुपारी 4 वाजता पद्मश्री बाबुभाई राठी सभागृह येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मसिआ इनकॉन टॉक्सचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, विशेष अतिथी म्हणून मनपा पर्यावरण विभागाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून अमित टिल्लू उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मसिआ इनकॉन टॉक्समध्ये किरण चव्हाण, मनपा उपआयुक्त विजयकुमार मुंडे, पर्यावरण तज्ज्ञ शेखर गायकवाड, देवांग जानी हे सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास व्यापारी, उद्योजक, पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष सुधकार देशमुख, पर्यावरण समितीच्या चेअरपर्सन डॉ. धनश्री हरदास, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन कांतिलाल चोपडा, को-चेअरमन संजय सोनवणे, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे, सचिव विनी दत्ता यांनी केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT