उत्तर महाराष्ट्र

नाशिक : लासलगाव येथे टायरच्या गोदामाला भीषण आग

गणेश सोनवणे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
येथील बडोदा बँकेसमोर असलेल्या शिवरस्त्यावर टी. पी. टायरच्या गोदामाला सोमवारी (दि.28) दुपारी 4.30च्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत टायरच्या गोदामामधून प्रचंड आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दिसत होते. आसपासच्या परिसरात आगीची धग जाणवत होती. त्यामुळे शेजारील कांद्याच्या खळ्यालादेखील ठिकठिकाणी आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले. धुरामुळे परिसर काळवंडला होता.

गोदामामधील लाखो रुपये किमतीचे टायर जळून खाक झाले. आग विझविण्याच्या कामात धुरामुळे अडथळे येत होते. या ठिकाणी बघ्यांची गर्दी उसळल्यामुळे रेल्वे स्टेशन मार्गावरही रहदारी खोळंबली होती. लासलगावला अग्निशामकचा बंब नसल्यामुळे आग विझविण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. पिंपळगाव बसवंत, चांदवड, मनमाड व येवला येथून तातडीने अग्निशामकचे बंब पाचारण करण्यात आले.

सुरुवातीला लासलगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी व स्थानिक युवकांनी पाण्याच्या टँकरने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे लोळ प्रचंड असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. आग लागण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून या घटनेचा तपास लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे करीत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT