मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. उंबरदे गावाजवळ पाण्याच्या दबावामुळे ही पाईपलाईन फुटल्याचे सांगण्यात येत आहे. येथे पाण्याचा मोठा कारंजाच निर्माण झाला आहे.
लाखो लिटर पाणी वाया जाऊन शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. या जलवाहिनीला नेहमीच कुठेना कुठे गळती लागत असते. काही दिवसांपासूनच देखभाल दुरुस्तीसाठी मोठा शटडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.