उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पीएफआय’च्या पाच सदस्यांना न्यायालयात हजर करणार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (पीएफआय) या संघटनेच्या पाच संशयितांना आज (दि. ३) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. या संशयितांना नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने २२ सप्टेंबरला अटक केली होती. त्यांना न्यायालयाने १२ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवारी (दि. ३) त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नेतृत्वाखाली नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २२ सप्टेंबर रोजी छापासत्र राबवून मालेगाव, पुणे, बीड व कोल्हापूर येथून पाच संशयितांना अटक केली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या संशयितांना ३ ऑक्टोबरपर्यंत १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (२६, मालेगाव), अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८), रझी अहमद खान (३१, दोघे रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख (२९, रा. बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या संशयितांना सोमवारी (दि.३) अतिरिक्त सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले जाणार आहे. यावेळी एटीएसकडून बारा दिवसांत केलेल्या तपासाची माहिती सादर केली जाणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात देशभरात कारवाई केली जात असून, केंद्र सरकारने या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देशविघातक कृत्य कोठे व कशी होणार होती, याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघटनेच्या २५ हून अधिक सदस्यांना राज्यभरातून ताब्यात घेतले आहे.

हेेही वाचा :

SCROLL FOR NEXT