उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ठाकरे सरकारकडून महाराष्ट्राची उत्कृष्ट सेवा : शिवसेना उपनेते घोसाळकर

अंजली राऊत

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेची निःस्पृहपणे उत्कृष्ट सेवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कोरोना काळात अत्यंत चांगली सेवा व नियोजन केल्याने जागतिक व देशपातळीवर ठाकरे सरकारची दखल घेण्यात आली. देशपातळीवर उद्योगधंदे बंद असतानाही सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, महिला, मुले यांची कुटुंबप्रमुख या नात्याने यशस्वी जबाबदारी पार पाडल्याने कोरोना काळात महाराष्ट्र अग्रेसर राहिला, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी केले.

शिवसंपर्क अभियान अंतर्गत येथील माळी मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुनील पाटील, ज्येष्ठ नेते प्रमोद शुक्ला, जिल्हा संघटक संजय दुसाने, उपजिल्हाप्रमुख सुनील देवरे, उपजिल्हाप्रमुख रामा मिस्तरी, विधानसभा संपर्कप्रमुख प्रमोद पाटील, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, महानगरप्रमुख राजाराम जाधव, तालुका संघटक शशिकांत निकम, उपमहापौर नीलेश आहेर, युवा सेना जिल्हाप्रमुख विनोद वाघ, आसिफ नॅशनलवाले, महिला आघाडी संघटक संगीता चव्हाण, छाया शेवाळे, ताराबाई शिरसाठ, सखाराम घोडके, भरत पवार, नरेंद्र सोनवणे, निळकंठ निकम यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे धोरण आणि वाटचाल यावर यावेळी चर्चा झाली.

जनतेचे आशीर्वाद मिळतील : कृषिमंत्री
कृषिमंत्री दादा भुसे यांनीही संकटांचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदतीचे धोरण राबविल्याचे सांगितले. दोन लाखांच्या आत कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमुक्ती केले. तसेच माजी सैनिक या खात्याअंतर्गत सर्व माजी सैनिकांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय देशपातळीवर महाराष्ट्राने सर्वप्रथम निर्णय घेतला. जय जवान, जय किसान घोषणा महाराष्ट्रात सार्थक झाली. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे सर्व क्षेत्रामध्ये सेवारत असल्यामुळे आगामी काळात जनता आशीर्वाद देईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT