पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील इच्छुकांच्या बैठकीप्रसंगी माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, विलास शिंदे, महेश बडवे, बाळासाहेब कोकणे, डी. जी. सूर्यवंशी, गोकुळ पिंगळे आदी. (छाया : गणेश बोडके) 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीत रंग चढण्यास सुरुवात

अंजली राऊत

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांची बैठक शालिमार येथील शिवसेना कार्यालयात पार पडली. यावेळी उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली.

माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी मनपा गटनेते विलास शिंदे, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, गोकुळ पिंगळे यांच्यासह इच्छुक उमेदवार भारती ताजनपुरे, सविता तुंगार, जगन आगळे, प्रकाश म्हस्के, भास्कर गावित, उत्तम खांडबहाले, उत्तम आहेर, नवनाथ गायधनी, गोकुळ काकड, संजय तुंगार, सुरेश निमसे, दिनकर पाळदे, भरत आहेर, अशोक (बालम) बोराडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ही निवडणूक स्वबळावर लढवून ती जिंकण्याची आमची सक्षम यंत्रणा तयार आहे. निवडणूक स्वतंत्रपणे लढवाव्यात असे इच्छुक उमेदवारांचे म्हणणे असून त्यांचा आम्ही आदर करतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अन्य मित्र पक्षही शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांच्याशी युती करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय श्रेष्ठी घेतील. माघारीच्या अंतिम तारखेच्या आधी याबाबतचा फैसला निश्चितच होईल, असे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख प्रमुख दत्ता गायकवाड म्हणाले. आम्ही सर्व ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार असल्याचे उपनेते सुनील बागूल म्हणाले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते यांनीही मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT