नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हिरावाडीतील लाटेनगर परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विष्णु माधव केदार (४३, रा. हिरावाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चारेट्याने शनिवारी (दि.२९) सकाळी अकराच्या सुमारास घरफाेडी करून ४० हजार रुपयांची रोकड व ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.