उत्तर महाराष्ट्र

नाशिक : कर थकविलेल्या वाहनांचा लिलाव

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाहनकर न भरलेल्या व विविध गुन्ह्यांत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जप्त केलेल्या 19 वाहनांचा जाहीर ई-लिलाव दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 11 ला करण्यात येणार आहे. या ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी 24 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रदीप शिंदे यांनी केले आहे. ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी दिलेल्या मुदतीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत www.eauction.gov.in (Website) या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे 35 हजार रुपये रकमेचा आरटीओ नाशिक या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सह नोंदणी करून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. या लिलाव प्रक्रियेत जीएसटीधारकांनाच सहभाग घेता येणार आहे. लिलावाच्या अटी व शर्ती दि. 19 एप्रिलपासून www.eauction.gov.in (Website) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT