येवला : मानोरी (बु.) येथे वीर जवान अजित शेळके यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना मान्यवर. समवेत लष्करी अधिकारी. (छाया : अविनाश पाटील) 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘अमर रहे’च्या घोषणा अन् शोकाकुल वातावरणात जवान अजित शेळके यांना अखेरचा निरोप

अंजली राऊत

नाशिक (येवला)  : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मानोरी (बु.) येथील वीर जवान अजित शेळके यांच्यावर सोमवारी (दि. २०) शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान अजित शेळके यांचे बंधू विजय शेळके यांनी त्यांना अग्निडाग दिला.

जवान अजित गोरख शेळके

शासनाच्या वतीने तहसीलदार प्रमोद हिले व तालुका पोलिस निरिक्षक पांडुरंग पवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वतीने संपर्क कार्यालयप्रमुख बाळासाहेब लोखंडे यांनी पुष्पचक्र अपर्ण केले. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे ५४ अरमाड बटालियनमध्ये कार्यरत असलेले जवान अजित शेळके (२९) यांचा कर्तव्यावरून घरी परतत असताना अपघात झाला. त्यांच्यावर सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी (दि. १८) त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव सोमवारी (दि. २०) सकाळी ८ च्या सुमारास मानोरी (बु.) येथे दाखल झाले. पार्थिव पहिल्यांदा त्यांच्या घरी नेण्यात आले. नंतर देशभक्तीपर गीतांनी तसेच फुलांच्या हारांनी सजविलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी जि.प.चे माजी कृषी सभापती संजय बनकर, पं. स. माजी सभापती संभाजीराजे पवार, सामजिक कार्यकर्ते गोरख पवार, सरपंच नंदराम शेळके, कॅ. करनदीप सिंह, नायब सुभेदार लीजेश ए. यांच्यासह सैन्य दलातील त्यांचे सहकारी व येवला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT