न्यायालयात होईल माझी हत्या : इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती

पुढारी ऑनलाईन डेस्क : तोशाखान प्रकरणी न्यायालयात साक्ष नोंदवताना माझी हत्या होऊ शकते, अशी भीती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व तेहरीक-ए-इन्साफ ( पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. (Imran Khan)
पाकिस्तान सरकारने इम्रान खान यांच्यावर विविध गुन्हे दाखल केले आहे. तोशाखान प्रकरणी ते शनिवारी (दि. १८) सुनावणीकरिता इस्लामाबाद न्यायालयात उपस्थित राहिले होते. यानंतर त्यांनी ट्विट करत माझी हत्या होऊ शकते, असे म्हटले आहे. या प्रकरणी न्यायालयाने व्हर्चुअल (आभासी )पद्धतीने सुनावणी घ्यावी, अशी विनंतीही इम्रान खान यांनी केली आहे. (Imran Khan) तसेच त्यांनी पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अत्ता बंदियाल यांना एक पत्र लिहून त्यांच्यावरील खटल्यांबाबत माहिती देत मदत मागितली असल्याचेे वृत्त पाकिस्तानमधील माध्यमांनी दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अनेक घडामोडी पहायला मिळाल्या. तोषाखानप्रकरणी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतरचे त्यांच्यावरचे संकट अधिक वाढले होते. मात्र न्यायालयाने त्यांच्या अटकेवर तात्पुरती स्थगिती आणत त्यांना दिलासा दिला. पण दरम्यानच्या काळात त्यांच्या पीटीआय पक्षावर बंदी घालण्यात येणार अशा चर्चा आहेत.
Toshakhana Case : काय आहे प्रकरण?
२०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आले. या काळात त्यांना अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. भेटवस्तूंमध्ये एक महागडी मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. त्या तोशाखान्यात (देशातील गोदाम) जमा करण्यात आल्या. नंतर त्यांनी सवलतीच्या दरामध्ये त्या वस्तू विकत घेतल्या आणि मोठ्या नफ्यात त्याची विक्री करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्यावर केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी इम्रान यांनी सांगितले होते की, २१,५६ कोटी रुपये भरल्यानंतर राज्याच्या तिजोरीतून खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून सुमारे ५८ लाख रुपये मिळाले होते. यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. या प्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.
तोशाखाना प्रकरणी इम्रान ठरले होते अपात्र
निवडणूक आयोगाने तोशाखाना प्रकरणात खोटी विधाने केल्याबद्दल पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार, परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी किंवा तोशाखान्यात ठेवली पाहिजे. जर राज्याच्या प्रमुखाला भेटवस्तू ठेवायची असेल तर त्याला त्याच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल. हे लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात ठेवल्या जातात किंवा त्याचा लिलाव केला जाऊ शकतो आणि त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा होतो.
The scenes I was confronted with as I entered the gates of Judicial Complex. Let there be no doubt that this force along with the ‘Unknowns’ – namaloom afraad – were there not to
put me in jail but to eliminate me by staging a mock fight & pretending my death was an accident. pic.twitter.com/7Pt2zZLLqK— Imran Khan (@ImranKhanPTI) March 21, 2023
हेही वाचा
- Khalistani Organization : खलिस्तान समर्थकांवर कडक कारवाई करा; ब्रिटन खासदाराच्या पोलिसांना सूचना
- Imran Khan Toshakhana Case : इम्रान खान यांना मोठा दिलासा; अटक वॉरंट रद्द
- Imran Khan : इम्रान खान यांच्या निवासस्थानातून Ak-47 जप्त!
- Imran Khan : मला तुरुंगात टाकणे हा ‘लंडन प्लॅन’चा भाग; इम्रान खानचा शरीफांवर हल्लाबोल