बिबट्या  
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बिबट्याचा थेट घरात शिरुन शेळीवर हल्ला

गणेश सोनवणे

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील वडगाव -सिन्नर शिवारात मिळन वस्तीवर बिबट्याने थेट घरात शिरून एका शेळीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी (दि. 9) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. भाऊराव दगू वाघ असे शेळीमालकाचे नाव आहे.

वडगाव सिन्नरच्या शिवारातील ढोकी मंदिर परिसरातील मिळन वस्तीवर वाघ कुटुंबीयांचे घर आहे. या घरातील सदस्य बसलेले असताना बिबट्याने थेट घरात शिरून शेळीवर हल्ला चढवला. काही क्षण वाघ कुटुंबीयांची तारांबळ उडाली. मात्र, सर्वांनी आरडाओरड करून बिबट्याला पळवून लावले. मात्र, या हल्ल्यात शेळीच्या नरड्याला तसेच पोटाजवळ गंभीर जखमा झाल्या. घटनेनंतर बिबट्या अंधारात पसार झाला. दरम्यान, वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुदाम वाघ, राजेंद्र चव्हाणके, संदीप आढाव, रमण माळी, शरद वाघ, दत्तू मोरे, अनिल वाघ, यशवंत वाघ आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

उसाच्या शेतात मांडले ठाण
दरम्यान, या वस्तीच्या जवळपास असलेल्या उसाच्या शेतात बिबट्याने ठाण मांडलेले असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. शेळीवर हल्ला केल्यानंतर बिबट्या या उसात आश्रयास गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परिणामी बिबट्याच्या भीतीने रात्री-अपरात्री घराबाहेर पडणे, शेतीला पाणी भरणे यासाठी शेतकरी धजावत नसल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT