मालेगावचे कलिंगड काश्मिरला रवाना (प्रातिनिधिक फोटो) 
उत्तर महाराष्ट्र

मालेगावच्या कलिंगडाची चव चाखणार काश्मीर

गणेश सोनवणे

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
'विकेल ते पिकेल' या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील कलिंगडाचे पहिले वाहन काश्मीरला रवाना झाले. लेंडाणे येथील शेतकरी अनिल जगताप यांनी 0.30 हेक्टरमध्ये रसिका वाणाचे कलिंगड पिकाचे उत्पादन घेतले असून, त्यांचा माल काश्मीरला पाठविण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली आहे.

यावेळी तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, सुधाकर पवार, भास्कार जाधव, मोहिनीराज मोरे, अनिल बच्छाव, संदीप राजनोर आदी उपस्थित होते. शेतकर्‍याचे उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारभाव आणि विक्रीचे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे. तालुक्यात 52 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. त्यात भाजीपाला विक्री व्यवस्थापनात गिरणाई ग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, अंजदे बुद्रुक ही अग्रेसर आहे.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कंपनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन द्राक्ष, कलिंगड इत्यादी खरेदी करून कोणताही नफा न घेता, शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला माल काश्मीर, अनंतबाग, रोहतक, अंबाला, सिलगुडी, पश्चिम बंगाल, तर द्राक्ष नेपाळ येथे विक्रीसाठी पाठवित आहेत, असे तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी सांगितले.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलेलं महाराष्ट्रातलं एकमेव कोर्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT