पं. अभिजित कश्यप , होरामार्तंड
नवग्रह मालिकेत शनी हा अत्यंत बलाढ्य असा ग्रह आहे. न्याय निष्टुरपणा हे शनीचे वैशिष्ट्य. मानवाला त्याचा कृतकर्माचे प्रायश्चित देणारा हा ग्रह आहे. त्याबरोबर अथक परिश्रम, चिकाटी, प्रामाणिकपणा या गुणांचे फळ देणाराही शनी आहे. मेहनती आणि प्रामाणिकपणा या गुणांचे फळ देणाराही शनी आहे. मेहनती आणि प्रामाणिकपणाने कष्ट करणाऱ्याला शनी भरभरून संपत्ती आणि वैभव देतो.
गुरुवार दि. २९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. धनू राशीची साडेसाती खंडित होत आहे. तर मीन राशीला साडेसाती सुरू होत आहे.
वृषभ, तूळ, मीन राशींना शनी सुवर्ण पादाने येत आहे. त्याचे फल चिंता असे आहे. कर्क, वृश्चिक व कुंभ राशींना शनि रौप्य पादाने व मिथून, कन्या, मकर, राशींना ताम्र पादाने येत आहेत. त्याचे फळ अनुक्रमे शुभ आणि अर्थ प्राप्ती असे आहे.
मेष, सिंह, धनु राशींना शनी लोह पादाने येत असून, त्याचे फळ कष्ट असे आहे. लोह पादाने येणारा शनी शुभ असल्याने कष्ट होत नाहीत.
मकर राशीच्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू होत आहे. पहिल्या दोन टप्प्यात त्रास झाला असल्यास हा टप्पा शारीरिक, आर्थिक, कौटुंबिकदृष्ट्या चांगला जाऊ शकतो. कुंभ राशी ही शनीची स्वराशी असल्याने कुंभ राशींच्या व्यक्तींना फार त्रास संभवत नाही. मीन राशीच्या व्ययस्थानी शनी येत असल्याने अनावश्यक खर्च उद्भवतील. वृद्ध व्यक्तींची चिंता राहील.
शनी अनिष्ट असलेल्या व्यक्तींनी शनिवारी उपोषण करावे. शनि आणि मारुती यांचे दर्शन घ्यावे, शनि व मारुतीला तेल वहावे. शनि स्तोत्र, शनि महात्म्य यापैकी एकाचे वाचन करावे.
नीलांजनं समाभासम्,
रविपुत्रम् यमाग्रजम्,
छायामार्तंड संभूतम्
तं नमामी शनैश्चरम ||
हा शनिचा मंत्र आहे. त्याचे पठण करावे, त्याचा लाभ होईल.
सचोटीने आणि प्रामाणिकपणाने व्यवहार केल्यास शनीचा कृपालाभ होतो. मकर आणि कुंभ या दोन्ही राशींना साडेसातीत काहीसा दिलासा मिळतो.
लोखंड, शिसे, खनिकर्म यावर शनिचे प्राबल्य आहे. शनी हा श्रमजीवी वर्गाचा कारक आहे. दीर्घोयोगी व्यक्तींना शनी निश्चित यश देतो.
भारतात अनुकूलता
शनी हा भारताच्या लग्न कुंडलीत दशमस्थानी आणि चंद्र कुंडलीत धनस्थानी येत आहे. भारताच्या कुंडलीत शनि अनुकूलस्थानी येत असल्याने आगामी काळात भारताला समृद्धीचा जाऊ शकेल. आर्थिक, औद्योगिकदृष्ट्या देश आत्मनिर्भर होऊ शकेल.