उत्तर महाराष्ट्र

धुळे : लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो; दोन महिन्यांनी भरले धरण

Shambhuraj Pachindre

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साकी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सर्वात मोठे लाटीपाडा धरण अखेर मंगळवारी (दि.२) रात्री ओव्हरफ्लो झाले. पांझरा नदीच्या उगम स्थानावर पावसाचा जोर कायम आहे. यामुळे भागात संततधार पावसामुळे सर्व नदी, नाले, बंधारे, ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे धरण क्षेत्रात पाणी आल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

पांझरा नदीच्या उगमस्थानी पश्चिम पट्ट्यातील शेंदवड मांजरी, उमरपाटा या भागात सोळा दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे पांझरा नदीवरील लाटीपाडा धरण मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहु लागल्यामुळे धरणावर असलेल्या डावा व उजवा कालव्याद्वारे हजारो एकर शेती ओलिताखाली येते.

यामुळे साक्री तालुक्यातील रब्बी पिकाला व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पिंपळनेर परिसरातील जामखेली नदीवरील धरण, कान नदीवरील मालगाव धरण काबरा खडक, एमआय टॅंक पूर्ण क्षमतेने दि. ११ जुलैला रात्री भरले आहेत.
साक्री तालुक्यासाठी पांझरा अर्थात लाटीपाडा मध्यम प्रकल्प गेल्यावर्षी दि. १२ जुलैला पूर्ण भरला होता. यंदा दि.१ऑगष्ट रात्री आठच्या सुमारास ओसंडू लागल्याने पिंपळनेरच्या पांझरा नदीला पूर आला आहे. यामुळे नदी शेजारील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सद्या प्रकल्पाच्या सांडव्यातून ३६९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT