Monu Manesar: हरियाणा हिंसाचारप्रकरणी चर्चेतील मोनू मानेसर आहे तरी कोण? | पुढारी

Monu Manesar: हरियाणा हिंसाचारप्रकरणी चर्चेतील मोनू मानेसर आहे तरी कोण?

पुढारी ऑनलाईन : हरियाणातील नूह येथे सोमवारी (दि.३१ जुलै) विश्व हिंदू परिषदेच्या  शोभा यात्रेदरम्यान हिंसाचार झाला. यानंतर मागील दाेन दिवस राज्‍यातील अनेक भागात हिंसाचाराचे लाेण पसरले. या प्रकरणात  मोनू मानेसर हा तरुण चर्चेत आला आहे. ताे गुरुग्राममधील (हरियाणा) मानेसरचा रहिवासी आहे. २८ वर्षीय मोनूचे खरे नाव मोहित यादव आहे. तो बजरंग दलाशी संबंधित असून गोरक्षक (Monu Manesar) म्हणून काम करत असल्याचे देखील समोर आले आहे.

काही महिन्यांपूर्वी राजस्थानमधील भरतपूर येथील जुनैद-नासीर याचा मृतदेह भिवानीमध्ये जळालेल्या कारमध्ये सापडला होता. मोनू हा जुनैद-नासिर हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. या यात्रेपूर्वी मोनू याने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले होते. ज्यामध्ये त्याने नूहच्या धार्मिक मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचा दावा करत, त्यांच्या समर्थकांनाही यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, त्यांच्या निवेदनातील विधानावरूनच हरियाणातील नूहमध्ये हिंसाचार (Monu Manesar) भडकल्याचे बोलले जात आहे.

Monu Manesar : मोनू सोशल मीडियावर सक्रिय

मोनू याने त्याच्या सोशल मीडियावरून केलेल्या विधानाला प्रत्युत्तर म्हणून इतर समाजातील लोकांनी निषेध केला. याआधी फिरोजपूर झिरकाचे आमदार ममन खान यांनीही मोनू मानेसर कारवाई केली जाईल, असे  विधानसभेत म्‍हटले होते. मोनू मानेसर सोशल मीडियावर सक्रिय आहे. फेसबुकवर त्यांचे सुमारे ८३ हजार फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गोरक्षणाशी संबंधित व्हिडिओ तो वारंवार त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो.

मोनूच्या व्हिडिओची चौकशी केली जाईल

नूह हिंसाचारानंतर हरियाणाचे पाेलीस महासंचालक पीके अग्रवाल म्हणाले की, “पोलीस हिंसाचारावर कडक कारवाई करत आहेत. मोनू मानेसरच्या व्हिडिओसह त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीची चौकशी केली जाईल. यासाठी विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत.”

हेही वाचा:

Back to top button