जळगाव : जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असतानाच दिग्गज नेत्यांच्या मुलांनाही मतदारांनी साथ दिल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. यात जळगाव शहराचे विद्यमान आमदार सुरेश भोळे, विद्यमान आमदार शिवसेनेचे डॉक्टर चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव, माजी महापौर ललित कोल्हे यांचे चिरंजीवांचा समावेश आहे.
आमदार सुरेश गोरे यांची सुपुत्र विशाल घोडे हे जळगाव महापालिकेतील प्रभाग क्रमांक 7 क मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली. माजी महापौर भारती सोनवणे व माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांचे पुत्र सोनवणे कल्पेश कैलास प्रभाग क्रमांक चार क मधून विजय झाले.
प्रभाग क्रमांक पाच ब मधून सोनवणे यांची कन्या प्रतीक्षा कैलाश सोनवणे विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक 18 अमधून डॉक्टर चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉक्टर गौरव सोनवणे हे शिवसेनेच्या तिकिटावर बिनविरोध निवडून आले आहेत. तर 11 अ डॉक्टर अमृता चंद्रकांत सोनवणे या विजयी झाल्या आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे सुपुत्र प्रफुल्ल गुलाबराव देवकर प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झालेत. या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक चार मधून ललित कोल्हे यांनी पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत बाजी मारली. प्रभाग क्रमांक 11 कमधून सिंधू कोल्हे ,11 डमधून ललित कोल्हे आणि प्रभाग क्रमांक 4 डमधून पीयूष कोल्हे हे एकच परिवारातील आजी, मुलगा आणि नातू विजयी झालेले आहेत विशेष म्हणजे ललित कोल्हे हे एका गुन्ह्याप्रकरणी नाशिक कारागृहात आहेत.