जळगाव : शहरातील प्रतिष्ठित गोलाणी मार्केट येथे बुधवारी भर दुपारी २ वाजता एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर जुन्या वादातून चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मार्केटमध्ये कामानिमित्त आलेल्या एका पोलिसांने प्रसंगावधान राखून धावत जाऊन हल्लेखोराला ताब्यात घेतले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
साई गणेश गोराडे सोनू उर्फ जय (वय १७, रा. शंकरराव नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो देवकर महाविद्यालय येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. आई, वडील, बहीण यांच्यासह तो शंकरराव नगर येथे राहत होता.दरम्यान संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे (वय २५, रा. चौगुले प्लॉट,जळगाव) याच्याशी त्याचे जुने वाद होते. या शिवाय बुधवारी सकाळी देखील शुभम आणि साई यांचे एकमेकांशी किरकोळ कारणावरून वाद झाले होते. दुपारी गोलाणी मार्केट जवळ साई गोराडे हा कामानिमित्त आला होता.
तेव्हा गोलाणी जवळ उभा असलेल्या संशयित आरोपी शुभम याने साईला पाहिले आणि त्याने चाकू काढून साई गोराडे याच्या उजव्या बाजूला चाकूने जबरदस्त वार केला. तसेच डाव्या बाजूला देखील चाकू मारला. यावेळेला गोलाणी मार्केट येथे मोबाईलच्या कामानिमित्त आलेले एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस हवालदार रमेश बाबुलाल चौधरी हे घटनास्थळी धावले.
त्यांनी संशयित शुभम सोनवणे याला धरले आणि साई बोराडे याच्यावर आणखी वार होण्यापासून वाचवले.तात्काळ शुभम सोनवणे याला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. तसेच जखमीला नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय बाहेर दिल्यावर रुग्णालयात उपचारासाठी हलवले.