जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात अनेक राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सर्वांना यंदाच्या महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुतीच्या समीकरणामुळे काही उमेदवारांना भाजपमध्ये असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. उद्धव ठाकरे गटातून आलेले विजय बांदल, माजी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, नितीन बर्डे आणि नितीन सपके यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र जयश्री महाजन, सुनील महाजन आणि त्यांच्यासोबत प्रवेश केलेले प्रशांत नाईक यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. मशाल सोडून कमळ हाती घेतलेल्या या उमेदवारांना अखेरीस हातावर घड्याळ बांधावे लागले आहे.

ललित कोल्हे कारागृहातून निवडणूक लढवणार
शिंदे गटाकडूनही घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला असून माजी महापौर ललित कोल्हे, सिंधू कोल्हे आणि त्यांचा मुलगा अशा एकाच कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. ललित कोल्हे सध्या कारागृहात असतानाही ते निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, उमेदवारी वाटपामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी थेट नेत्यांसमोर आपला रोष व्यक्त केला असून हे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय राहणार की नाही, हा प्रश्न नेतृत्वासमोर उभा राहिला आहे. भाजपाकडून चंद्रकांत सोनवणे यांच्या दोन्ही मुलांना तसेच माजी महापौर भारती सोनवणे यांच्या दोन्ही मुलांना उमेदवारी देण्यात आली आहे. घराणेशाहीला थारा दिला जाणार नाही आणि जुन्या नेत्यांना संधी दिली जाणार नाही, असे जाहीर वक्तव्य असतानाही काही ठिकाणी भाजपाने घराणेशाही कायम ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.