जळगाव: पुढारी वृत्तसेवा ; शहरातील पिंप्राळा भागात असलेल्या अनुपम सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे सेफ्टी ग्रील तोडून घरात शिरुन तीन लाख 26 हजार रुपये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. या प्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील प्लॉट नंबर 26, गट नंबर 4/1/2 तेजस श्री गुरुदत्त नगर सेमिनार हॉलच्या समोर अनुपम सोसायटी पिंप्राळा येथे राहत असलेले गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर संजय भास्करराव आफ्रे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे सेफ्टी ग्रील तोडून चौरस भाग इतका दरवाजा कापून आत शिरुन घरातून तीन लाख 26 हजार रुपये सोन्या-चांदीचे दागिने, 47 हजार रुपये रोख असे घेऊन पसार झाले. या प्रकरणी संजय आफ्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख हे करीत आहे.
हेही वाचा :