Bhusawal Girl Assaut Pudhari
जळगाव

Bhusawal Girl Assaut: भुसावळमध्ये संतापजनक घटना; २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरणी ५५ वर्षीय संशयितावर गुन्हा

शहरात खळबळ; पोस्ट विभागातील तरुणीची तक्रार, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ शहरातील मुक्ताई नगर भागातील ओमकार हाईट बिल्डिंगमध्ये एका ५५ वर्षीय नराधमाने २२ वर्षीय तरुणीवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

पीडित तरुणी ही पोस्ट विभागात कार्यरत असून, या घटनेने भुसावळ शहरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी अद्याप फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय तरुणी ही मूळची चोपडा तालुक्यातील असून ती सध्या भुसावळ येथील हुडको कॉलनी परिसरात वास्तव्यास आहे. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३:४५ ते ४:३० वाजेच्या सुमारास, आरोपी राजू लालू गायकवाड (वय ५५, रा. हुडको कॉलनी, भुसावळ) याने पीडितेला मुक्ताई कॉलनी परिसरातील ओमकार हाईट बिल्डिंगमधील आपल्या 'स्वामीराज ऑफिस' या दुकानात बोलावले.

आरोपीने आपल्या वयाचे भान न राखता, पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत तिला दुकानात गाठले. तेथे तिची इच्छा नसताना आणि तिच्या संमती विना तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडितेने १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास भुसावळ शहर पोलीस स्टेशन गाठून आपबिती कथन केली.

पीडितेच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिसांनी आरोपी राजू लालू गायकवाड याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१) (बलात्कार), ३५१(२) (धमकावणे) आणि १२७(२) (बेकायदेशीर डांबून ठेवणे) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २८/२०२६ दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.

या गुन्ह्याचा पुढील तपास भुसावळ शहर विभागाचे स.पो नि. राहुल भंडारे हे स्वतः करीत आहेत. गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटले तरी आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT