Bangladeshi woman detained Jalgaon Pudhari
जळगाव

Jalgaon crime news | बांगलादेशी 'फरीदा' बनली भुसावळची 'जस्मिन'! ५ हजारांत नदी पार करून भारतात घुसखोरी

बनावट कागदपत्रांच्या 'खेळा'चा जळगाव पोलिसांकडून पर्दाफाश

पुढारी वृत्तसेवा

​भुसावळ : देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आणि जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा मोठी कीड लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भुसावळच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी घुसखोर महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. जळगाव पोलिसांनी अत्यंत गोपनीय आणि तांत्रिक तपास करत या आंतरराष्ट्रीय घुसखोरीचा पर्दाफाश केला आहे. आरोपी महिलेविरुद्ध इमिग्रेशन आणि परदेशी कायदा, २०२५ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

​५ हजारांची 'बोट सफर' आणि थेट भुसावळात 'बस्तान'

​पोलीसांच्या प्राथमिक चौकशीत या घुसखोर महिलेने अत्यंत धक्कादायक कबुली दिली आहे. मूळची फरीदा बेगम मोहम्मद खान (वय ४२ वर्षे, रा. भीमकाठी, उपजिल्हा नाझीरपूर, जिल्हा पीरोजपुर, बांगलादेश) असं नाव असलेल्या या महिलेने सन २००९ मध्ये एका बांगलादेशी दलालाला अवघे ५ हजार रुपये दिले. या दलालाच्या मदतीने तिने बोटीने नदी ओलांडून पश्चिम बंगालच्या सीमेतून भारतात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिथून ती रेल्वेने थेट भुसावळात आली आणि 'दीनदयाल नगर' या भागात 'जस्मिन बी मोहम्मद खान' या बनावट नावाने राहू लागली.

​मृत बहिणीच्या नावे बनवली भारतीय ओळखपत्रे

​भारतात आपले बस्तान घट्ट करण्यासाठी या महिलेने अत्यंत चलाखीने सर्व कागदपत्रे गोळा केली. तिने तिच्या मृत बहिणीच्या नावावरील लाईट बिल आणि इतर कागदपत्रांचा गैरवापर केला. ​बनावट रेशन कार्ड, ​बनावट आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ​पॅन (PAN) कार्ड आणि ​बँक पासबुक या पुराव्यांचा बेकायदेशीर वापर करण्यात आला. ​इतकेच नव्हे, तर या बनावट कागदपत्रांच्या जोरावर तिने थेट भारतीय पासपोर्ट देखील मिळवला! अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, याच बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे ही महिला मे २०२३ मध्ये बांगलादेशात जाऊन, तिथे नातेवाईकांना भेटून पुन्हा बिनदिक्कतपणे भारतात परतली होती.

​मोबाईलमधील '+880' ने उडवली झोप

​गुन्हेगारी कारवाया आणि संशयास्पद हालचालींमुळे पोलीस तिच्यावर पाळत ठेवून होते. अखेर बाजारपेठ पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल जप्त केला. या मोबाईलच्या फॉरेन्सिक आणि तांत्रिक विश्लेषणात पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे लागले. या मोबाईलमधील 'IMO' आणि 'WhatsApp' या ॲप्सच्या माध्यमातून बांगलादेशचा कंट्री कोड (+880) असलेल्या नंबरवर सातत्याने व्हिडिओ कॉल आणि चॅटिंग झाल्याचे सिद्ध झाले. तसेच तिच्या मोबाईलमध्ये बांगलादेशातील तिच्या मूळ जन्मदाखल्याचा फोटोही पोलिसांना आढळून आला, ज्यामुळे तिचे बिंग फुटले.

​जळगाव पोलिसांचे नागरिकांना जाहीर आवाहन

​सदर प्रकरणात फरीदा बेगम हिला भारतात सर्व शासकीय बनावट कागदपत्रे तयार करून देणारे स्थानिक दलाल, एजंट आणि सरकारी विभागातील संशयित व्यक्तींचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. ​या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन बांगलादेशी 'फरीदा' बनली भुसावळची 'जस्मिन'! ५ हजारांत नदी पार करून भारतात घुसखोरी; बनावट कागदपत्रांच्या 'खेळा'चा जळगाव पोलिसांकडून पर्दाफाश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT