Jalgaon crime news: भुसावळात धाडसी चोरी: चोरट्यांची अनोखी 'एन्ट्री', पावणेदोन लाखांचे दागिने लंपास!

भुसावळ शहरातील कृष्णा कॉलनी भागात एका रेल्वे कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
theft
theftPudhari
Published on
Updated on

Jalgaon crime news

जळगाव: भुसावळ शहरातील कृष्णा कॉलनी भागात एका रेल्वे कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख ७६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे कल्याण (ठाणे) येथील रहिवासी असलेले आणि सध्या भुसावळच्या कृष्णा कॉलनीत राहणारे दिलीप रणविजय गुप्ता (वय ५५) हे रेल्वेमध्ये नोकरीला आहेत. १ मे २०२६ रोजी ते आपल्या कुटुंबासह शालकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला. १ ते ११ मे या कालावधीत चोरट्याने घराच्या पाठीमागील शौचालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

theft
Jalna crime News : बसस्थानकावरील चोरट्यांचा डाव फसला

११ मे रोजी सकाळी फिर्यादी घरी परतले असता, त्यांना बेडरूममधील कपाटातील कपडे पलंगावर अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटात ठेवलेली दागिन्यांची पेटी तपासली असता, त्यातील सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्याने अतिशय शिताफीने घराची रेकी करून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये १५ ग्रॅमचे ब्रेसलेट (४० हजार), १० ग्रॅमच्या दोन चेन (३० हजार), ५ ग्रॅमचे झुमके (१५ हजार), १० ग्रॅमच्या दोन अंगठ्या (३० हजार), ५ ग्रॅमचे लॉकेट (१५ हजार) आणि १४ ग्रॅमचे मंगळसूत्र (३३,५०० रुपये). तर चांदीचे दागिने: २५० ग्रॅम वजनाची पायातील साखळी आणि कंबरपट्टा (१३ हजार रुपये), असा एकूण किंमत १ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाला चोरीला गेला.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. फिर्यादी दिलीप गुप्ता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युनुस शेख करीत आहेत.

theft
Jalgaon Robbery | जळगावात लग्नसराईत चोरटे सक्रिय; दोन वेगवेगळ्या घटनांत लाखांचा ऐवज लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news