

केज :- स्वस्तात सोन्याचे बिस्कीट खरेदी करण्यासाठी आलेल्या एका सोनाराचे रोख तीन लाख रुपये चोरट्यांनी लुटले. हे चोरटे पळून जात असलेल्या दहा ते बारा जणांच्या पैकी दोघे एका कारला धडकून अपघात झाला. या अपघातात दोघे चोरटे जखमी झाले आहेत तर इतर त्यांचे साथीदार पळून गेले.
धाराशिव जिल्ह्यातील एकाने माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील सोन्या चांदीचे व्यापारी दत्ता काकडे यांना सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यातून ओळख झालेल्या त्या इसमाने दत्ता काकडे यांना त्यांनी दुबईहून टॅक्स चुकवून आणलेले सोन्याचे बिस्कीटे हे बाजार बाजार भावा पेक्षा कमी दराने स्वस्तात देण्याचे अमिष दाखविले. या साठी त्यांना केज येथे बोलावून घेतले. दि. १७ मे रोजी फुलतो ३:३० ते ३;४५ च्या दरम्यान दत्ता काकडे आणि त्यांच्या सोबत कारागीर सतीश दीक्षित हे त्यांच्या लाल रंगाची किया क्र. (एम एच २३/बी एन ८३८७) या गाडीतून सोने खरेदी करण्यासाठी केज येथे गेले.
त्या नंतर व्हॉट्सअप ओळख झालेले आप्पा शिवाजी शिंदे, वय (३० वर्ष ) आणि त्याचा साथीदार विशाल रामकिसन शिंदे वय (३० वर्ष) यांनी सोनार दत्ता काकडे यांना बीड रोडवरील उमरी फाट्या जवळ असलेल्या गंगा माऊली साखर कारखान्याच्या परिसरात असलेल्या माध्यमिक विद्यालयाच्या भिंतीच्या आडबाजूला घेऊन गेले. तिथे गेल्या नंतर सोनार दत्ता काकडे याच्या सोबत असलेल्या कारागीर सतीश दीक्षित यांच्याकडील पिशवीतील तीन लाख रु. झडप घालून हिसकावून घेतले आणि एकाने सोनाराच्या पाठीत लोखंडी रॉड मारून जखमी केले.
पळून जाणाऱ्या चोरट्यांचा अपघात
हे चोरटे त्यांनी सोबत आणलेल्या मोटार सायकलवरून पळून गेले. त्या नंतर दत्ता काकडे आणि दीक्षित यांनी आरडा ओरड करताच येथे काही स्थानिक नागरिकांनी आवाज ऐकून ते त्यांच्याकडे येत असल्याचे दिसताच चोरटे शेतातून पळून गेले. मात्र त्यांच्या पैकी आप्पा शिवाजी शिंदे आणि विशाल रामकिसन शिंदे हे दोघे भरधाव वेगाने केजकडे येत होते. जमाव त्यांना अडवण्याचा करण्याचा प्रयत्न करीत असताना ते एका कारला धडकले. या अपघातात हे चोरटे आप्पा शिवाजी शिंदे, वय (२८ वर्ष) आणि त्याचा साथीदार विशाल रामकिसन शिंदे वय (३० वर्ष) दोघे रा. मांडवा ता. कळंब जि. धाराशिव हे दोघे चोरटे जखमी झाले. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णायात पोलिस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत.
ज्या ठिकाणी चोरट्यांचा अपघात झाला त्या ठिकाणी चोरट्याकडे असेल एक धारदार चाकू आणि केबल वायरचा बंच सापडा आहे. स्थानिक नागरिक पाठलाग करीत असल्याने घाबरून भरधाव वेगात पळून जात असलेले चोरटे हे एका इंडिगो गाडीला धडकल्याने हाती लागले अन्यथा ते पळून गेले असते.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यज पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस कॉन्स्टेबल संतोष गित्ते, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी गित्ते आणि हेडकॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे, चालक शिंदे हे घटनास्थळी हजर झाले. आणि त्यांनी सोनार दत्ता काकडे यांची विचारपूस केली.
सोनाराचा जीव वाचला :- अशा प्रकारच्या दरोड्याच्या गुन्ह्यात चोरीला विरोध केल्याने प्राणघातक हल्ला करण्याच्या घटना घडत असतात मात्र हा प्रकार दिवसा घडल्याने अनर्थ टळला. अन्यथा सोनाराची गळा चिरून हत्या देखील करण्यात आली असती.
अपघातातील इंडिकाचे नुकसान :- चोरटे धडकलेली इडिका कार क्र.(एम एच- ०५/ए जे-८३१२) ही येळंब येथील बबन वंजारे यांची आहे. त्यांचे खर्डा येथील मित्र केजकडे येत असताना त्यांची कार येळंब येथे बंद पडल्याने ते त्यांना सोडण्यासाठी केजला येत होते. त्यातच त्यांच्या कारला चोरटे धडकून अपघात झाला.
स्वस्तात वस्तू घेण्याच्या नादात कुणी फसू नये :- सोने किंवा दागिने स्वस्तात देण्याचे कुणी अमिष दाखविले ते नागरिकांनी त्यांना फसू नये आणि ही माहिती पोलिसांना कळवावी.
_ संदीप मांजरमे सहाय्यक पोलिस निरीक्षक, केज