उत्तर महाराष्ट्र

जळगाव : राजकीय सुडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई – एकनाथ खडसे

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भोसरी प्रकरणात कुठलेही तथ्य नाही. केवळ मी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलो म्हणून राजकीय सुडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई केली. माझ्या जावयाला विनाकारण अटकवणे, त्याचा जामीन होऊ न देणे यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. सर्वांनाच जामीन मिळू शकतो. मात्र सव्वा वर्षापासून माझ्या जावयला जामीन का मिळत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आमदार खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. चौधरी यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने नुकताच फेटाळून लावला आहे. चौधरी यांनी अनेक शेल कंपन्यांतून पैसे गोळा केल्याचे दिसत असल्याने आम्ही त्यांचा जामीन अर्ज फेटाळत आल्याचे न्यायालयाने आपल्या ऑर्डर कॉपीमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात खडसे यांनी राज्य सरकारवर आरोप करताना म्हटले की, मी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यामुळेच मला भोसरी प्रकरणात गोवण्यात आले आहे. या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, असा अहवाल एसीपीने कोर्टात सादर केला होता. माझ्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे जुना अहवाल बाहेर काढण्यात आला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. माझ्या जावयाला जामीन मिळू नये यासाठी राज्य सरकारने वरिष्ठ वकिलांचा फौजफाटा उभा केला आहे. मला त्रास देण्यासाठी माझ्या जावयाला कुठल्या तरी प्रकरणात अडकवून डांबून ठेवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. यंत्रणेच्या माध्यमातून तरुण उद्योजकाला छेडण्याचा हा प्रयत्न आहे, असेही खडसे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT