धुळे-दादर एक्स्प्रेसची आठवड्यातून तीनदा फेरी | पुढारी

धुळे-दादर एक्स्प्रेसची आठवड्यातून तीनदा फेरी

धुळे: पुढारी वृत्तसेवा
धुळे ते दादर स्वतंत्र रेल्वे सुरू होणार असून त्याबाबत रेल्वे विभागाने अधिसूचना जारी केले आहे, अशी माहिती खा. डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे. ही रेल्वे प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून तीन दिवस आणि प्रतिसाद मिळू लागताच रोज ही रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. धुळे – दादर एक्स्प्रेस आता धुळे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. आठवड्यातून तीन दिवस प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतल्यानंतर ही रेल्वे रोज धुळेकरांचा सेवेत राहील. याबाबत रेल्वे विभागाकडून आवश्यक ती तांत्रिक मंजुरीसह तयारी केली जात असल्याची माहिती खा. डॉ. भामरे यांनी दिली. धुळे स्थानकावरून सकाळी 6.30 वाजता रेल्वे सुटेल आणि दुपारी साधारण 1.15 वाजता दादर येथे पोहचेल तसेच दादर येथून सायंकाळी 4.15 वाजता सुटेल आणि रात्री 11.30 वाजता धुळे स्थानकावर पोहचेल, अशी माहिती रेल्वे विभागाकडून प्राप्त झाली आहे.

हेही वाचा:

Back to top button