जळगाव पुढारी वृत्तसेवा : जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ आयोजित जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळा शहरातील गोदावरी आय एम आर सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला. जळगाव येथील शिक्षकांना क्रीडाजीवन गौरव पुरस्कार, आदर्श जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ आयोजित जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी सरस्वती मातेचे पूजन व माल्यार्पण प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मानाचा क्रीडाजीवन गौरव पुरस्कार ए. टी. झाम्बरे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीपकुमार चौधरी यांना देण्यात आला. तर आदर्श जिल्हा क्रीडा पुरस्कार मिर्झा वसीम अफताब बेग (जळगाव), प्रा. गिरीश युवराज पाटील (पाचोरा), उत्तम बाबुराव चिंचाळे (भोकर), रमण एकनाथ भोळे (भुसावळ), पंजाबराव बबनराव पाटील (यावल), अशोक प्रेमसिंग पाटील (रावेर), सुरेश जयसिंग मोरे (मुक्ताईनगर), विकास रघुनाथ पाटील (जामनेर), राजेश प्रतापसिंग पाटील (एरंडोल), किशोर शालिग्राम पाटील (धरणगाव), धैर्यसिंग प्रतापसिंग राजपूत (पाचोरा), सतीश मधुकर पाटील (भडगाव), राहुल सुभाष साळुंखे (चाळीसगाव), विनायक गिरधर पवार (पारोळा), दगा दौलत राजपूत (अमळनेर ), साहेबराव सिताराम पाटील (चोपडा), डॉ. संजय राजधर निकम (बोदवड), किशोर माधवराव पाटील (जळगाव), युवराज पद्माकर माळी (रावेर), जितेंद्र अर्जुन फिरके (यावल), योगेश शशिकांत सोनवणे (जळगाव), नरेंद्र विश्वनाथ भोई (जळगाव) यांना देण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महासंघाचे सचिव शालीग्राम भिरुड, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित महानगरपालिकेचे उपायुक्त उदय पाटील, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, उपाध्यक्ष आनंद पवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राधेश्याम कोगटा, गोदावरी आय.एम.आर.कॉलेजचे संचालक डॉ. प्रशांत वारके, गोदावरी अभियांत्रिकी कॉलेजचे संचालक डॉ. विजय पाटील, जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष अरुण सपकाळे, जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष दिगंबर पाटील, शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवलकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी रमण भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार निवड समिती सदस्य म्हणून डॉ.पी.आर चौधरी, प्रा. आसिफ खान, डॉ. रणजित पाटील, शेखर पोळ, प्रशांत कोल्हे यांनी काम पाहिले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कांचन विसपुते, प्रास्ताविक राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रदिप तळवलकर यांनी केले. कार्यक्रमास पुरस्कार्थी कुटूंबासह तसेच असंख्य क्रीडासंचालक, तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष व सचिव, क्रीडाशिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रणजित पाटील, प्रशांत कोल्हे, प्रा. हरिश शेळके, प्रा. आसिफ खान, अजय देशमुख, निलेश पाटील, विजय विसपुते, गिरीश पाटील, सचिन सुर्यवंशी, जितेंद्र शिंदे, गिरीश महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.