उत्तर महाराष्ट्र

जळगाव : मंदाकिनी खडसे यांच्यासह ११ जणांविरुद्ध तक्रार दाखल; जिल्हा दूध संघाचा वाद पेटला

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

न्यायालयीन निर्णयानंतर जळगाव जिल्हा दूधसंघाचे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह इतर ११ जणांविरुद्ध प्रशासक मंडळाची गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूधसंघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप नोंदवला. त्यामुळे या प्रकरणी मंदाकिनी खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

संचालक मंडळ बरखास्तीनंतरही मंदाकिनी खडसे यांच्यासह संचालक मंडळातील ११ संचालकांनी जिल्हा दूधसंघाच्या आवारात बेकायदेशीररीत्या प्रवेश करून दूधसंघाच्या सभागृहात बैठक घेतली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊन गुन्हा घडल्याची शक्यता अरविंद देशमुख यांनी तक्रारीद्वारे व्यक्त केली आहे. तसेच संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. दूधसंघाच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार नागराज पाटील यांनी केली. या तक्रारीवरूनच जळगाव जिल्हा दूधसंघातील कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी शासनाकडून राज्य शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी चौकशी समिती गठित करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीत ५ अधिकाऱ्यांचा समावेश असून, २० ऑगस्टपर्यंत चौकशी करून तो अहवाल राज्य शासनाला देण्याचे आदेश दिले गेले. दरम्यान, दूधसंघाची जुनी कागदपत्रे जाळण्यात आली होती, असाही आरोप यावेळी करण्यात आल्याने शासनाने चौकशी समिती गठीत केली असून, एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT