उत्तर महाराष्ट्र

जळगाव : कॅब बुकिंगच्या नावाखाली एकाला ४९ हजाराचा ऑनलाईन गंडा

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : अमळनेर येथील व्यक्ती नाशिकला जाण्यासाठी  कॅब बुकिंगच्या नावाखाली  ४९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, अमळनेर येथे पवन चौक, देशमुख गल्ली, धनंजय शंकर पाटील (वय-५०)  यांना ८ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे जायचे असल्याने त्यांनी गुगलवरून एका वेबसाईटवर चौकशी केली असता त्यांना एका अनोळखी नंबरवरून माहिती पुरवण्यात आली. त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला की, 'तुमची बुकींग होऊन जाईल' त्यानंतर थोड्या वेळातच त्यांना मोबाईलवर व्हाट्सअपवर एक लिंक आली. त्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन १०० रुपये टाकून बुकिंग करण्यासंदर्भात सांगण्यात आले. त्यानुसार धनराज पाटील यांनी २ वेळा लिंकवर क्लिक करून ओपन करण्याचा प्रयत्न केला, पैश्यांचा व्यवहार झाला नाही. त्यानंतर त्यांनी एक वेळेस प्रयत्न केला असता त्यांच्या अकाउंटमधून १०० रुपये कमी झाले.

सायंकाळी 'ट्रॅव्हल गुरु' नावाची एपीके फाईल व्हाट्सअपवर पाठवले आणि ॲप डाऊनलोड करून सर्व ऑप्शन चालू करा, असे सांगितले. त्यानुसार पाटील यांनी सर्व ऑप्शन Allow केले.  काही मिनिटातच त्यांच्या बँक खात्यातून ४९ हजार रुपये ऑनलाईन कमी झालेल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल अहिरे करीत आहे.

हेही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT