देशातील शाळा, कॉलेज आणि विद्यापीठे पुर्ववत सुरु करा; संसदेत मागणी | पुढारी

देशातील शाळा, कॉलेज आणि विद्यापीठे पुर्ववत सुरु करा; संसदेत मागणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. यादरम्यान सरकारने शिक्षणासाठी ऑनलाईन माध्यमांचा वापर वाढवला. कोरोनाची रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर राज्यांनी काही प्रमाणात शाळा-कॉलेज सुरू केले होते. राज्यसभेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी शाळा-महाविद्यालयांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

अमरावती : आयुक्तांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आमदार रवी राणांसह १० जणांवर गुन्हा दाखल

देशात ज्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन महाविद्यालये सुरू आहेत, तिथे लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू व्हावेत. मनोज झा पुढे म्हणाले आहेत की अनेक विद्यार्थी डिजीटल शिक्षण घेण्यासाठी सक्षम नाहीत. गेल्या दोन वर्षांमध्ये देशातील सध्याच्या पिढीचे नुकसान झाले आहे. याची भरपाई करण्यासाठी अनेक वर्षे लागतील. ऑनलाईन शिक्षणाने देशातील विषमताही वाढवली आहे. मनोज झा यांनी पुढे स्वत:चा अनुभवही सांगीतला आहे. विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण सुरू असताना व्हिडीओ ऑफ करून बसतात. यामुळे संवाद होत नाही, शिक्षणात ऑनलाईन पद्धतीमुळे अनेक अडचणी येत आहेत.

Back to top button