उत्तर महाराष्ट्र

जळगाव :विटभट्टी व्यवसायासाठी लाच घेतल्याने लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ जाळ्यात

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

विटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. राजेंद्र लक्ष्मण पाटील (५५, रा.सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांचा सुमारे मागील ३० वर्षापासून निम ग्रामपंचायतीच्या हद्दीत विटभट्टीचा व्यवसाय असून तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे तहसिल कार्यालय अमळनेर यांचे नावे ६ हजार रुपये रॉयल्टी भरलेली आहे. तरी सुद्धा तक्रारदार यांना सदर लोकसेवक यांनी निम गावच्या ग्रामपंचायत हद्दीत जर विटभट्टी व्यवसाय करायचा असेल तर ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला घ्यावा लागेल, असे सांगून निम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात निम ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष २७,५०० रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानुसार तडजोडी नंतर लाच मागणी केलेल्या रक्कमेपैकी २५ हजार रुपये रोख रक्कम ग्रामसेवकाला निम ग्रामपंचायत कार्यालयात स्वतः स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचखोर ग्रामसेवकावर मारवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, नाईक ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, सचिन चाटे तसेच एएसआय एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी यांनी हा सापळा यशस्वी केला.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT