अजित पवारांना कुंकवाची अ‍ॅलर्जी, तरीही पुरवला चिमुकलीचा हट्ट; सोशल मिडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल | पुढारी

अजित पवारांना कुंकवाची अ‍ॅलर्जी, तरीही पुरवला चिमुकलीचा हट्ट; सोशल मिडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

पुणे; पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार नेहमी कार्यक्रमादरम्यान महिला भगिनीना सांगत असतात कि मला कुंकवाची अ‍ॅलर्जी आहे. कुंकू लावू नका. मात्र अजित पवार हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता, कार्यक्रमातील तीन वर्षाच्या एका चिमुकलीचा त्यांनी हट्ट पुरवला. अजित पवार हे कधीच कोणाच्या हातून कुंकू लावून घेत नाहीत.

मात्र या तीन वर्षाच्या एका चिमुकलीने टेबलवर चढून अजित पवार यांना तिच्या हातून औक्षण करून तर घ्यायला लावले. पण तिने अजित पवार यांना कुंकू लावून घेण्यास देखील भाग पाडले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अजित पवार यांनी एक खासगी कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी तीन वर्षाची क्रीतिका हिने अजित पवार यांना टेबलवर चढून ओवाळले आणि अक्षता देखील टाकल्या. त्यावेळी अजितदादांना कुंकू लावायला हात पुढे केल्यावर मला एलर्जी असल्याच सांगत समोर उभी असलेल्या निरागस मुलीकडे पाहून दादा म्हटले लावून टाक. त्या तीन वर्षाच्या चिमुकलीने अजित दादांना कुंकु लावून औक्षण केले.

Back to top button