उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सातभाई, मणियार भाजपमध्ये

गणेश सोनवणे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे संचालक अशोक सातभाई, माजी नगरसेवक भय्या मणियार यांनी रविवारी (दि. 27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

याप्रसंगी आ. राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नाशिकरोड मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव, लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरुस्कर, बाजीराव भागवत, संगीता गायकवाड, सुनील आडके, सचिन हांडगे, अ‍ॅड. मुकुंद आढाव, शांताराम घंटे आदी उपस्थित होते. शहर चिटणीस राजेश आढाव यांनी सूत्रसंचालन, तर प्रकाश घुगे यांनी प्रास्ताविक केले.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे पक्षांतर्गत कमकाज, नियमावलीची पद्धत वेगवगळी असल्याची चर्चा अनेकवेळा होत असते. मात्र, यावेळी सातभाई, मणियार यांच्या प्रवेशानंतर गमतीशीर किस्सा घडला. एकाच खुर्चीत दोघेही बसलेले पाहून माध्यमांनी दोघांची छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार आयोजकांच्या लक्षात आल्यानंतर लगेच मणियार यांना वेगळी खुर्ची देण्यात आली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT