उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जुगार व अवैधरीत्या मद्यसाठा आणि मद्यविक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवारी (दि.१०) शहर पोलिसांनी पाच ठिकाणी कारवाई करीत जुगाऱ्यांसह अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांची धरपकड केली.

गंगापूर पोलिसांनी संत कबीरनगर परिसरात दुपारी २.१५ च्या सुमारास कारवाई करीत पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. हे पाचही जुगारी टाइम कल्याण नावाचा मटका जुगार खेळताना व खेळवताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पाचही संशयित जुगाऱ्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले असून, त्यांच्याकडून तीन हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अंबड पोलिसांनी मंगळवारी (दि.१०) रात्री ८.१५ च्या सुमारास पंडितनगर येथे कारवाई करीत वाल्मीक अभिमन्यू केदार (३६) यास पकडले. त्याच्याकडून देशी दारूचा एक हजार १९० रुपयांचा अवैध मद्यसाठा आढळून आला. तर दुसऱ्या कारवाईत इंदिरा गांधी वसाहतीत रात्री कारवाई करून अजय उद्धव कणकुटे (२६) यास पकडले. त्याच्याकडूनही पोलिसांनी ६६५ रुपयांचा अवैध देशी मद्यसाठा जप्त केला आहे. या दोघांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी भगूर-लहवित रोडवर कारवाई करीत शुभम सुकदेव तनपुरे (२३, रा. वडगाव पिंगळा, ता. सिन्नर) यास मद्यविक्री करताना पकडले. शुभमकडून दोन हजार २२० रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात शुभम विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या जुगाऱ्यांवर झाली कारवाई

गंगापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अशोक ऊर्फ अशरोबा रेशमाजी साळवे (५१, रा. संत कबीरनगर), संदीप प्रल्हाद शेळके (५०, रा. सावरकरनगर, गंगापूर रोड), पंडित भिका बदादे (३१, रा. संत कबीरनगर), राजेंद्र प्रभाकर मराठे (३४, रा. अशोकनगर, सातपूर), रामदास बाळकृष्ण मानकर (५४, रा. मधुरवाडी, पंचवटी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT